मंगळवार, २१ एप्रिल, २००९

बुधवार, ८ एप्रिल, २००९

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं.......

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं ...

..............पण ती मजा काही वेगळीच होती

बघता बघता कॉलेज कधी
संपले काही कळलेच नाही......
नंतर ऑफ़िस लाईफ़ही सुरु झाले

पॉकेटमनी चे रुपांतर पगारात झाले
पण कॉलेजसाठी मिळणाऱ्या त्या ३००
रुपयांची मजा काही वेगळीच होती

ऑफ़ीसमधे जरी स्वत:चे separate
workstation असले तरी
कॉलेजमधल्या bench ची
मजा काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसच्या canteen मधे जातो
पण कॉलेजच्या canteen ची
मजा काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसमधे कॉफ़ी पीतो
पण college canteen मधल्या
त्या cutting ची मजा
काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसमधे येउन login
करतो, पण कॉलेजमधल्या
proxy ची मजा
काही वेगळीच होती

रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती

हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............

शनिवार, ४ एप्रिल, २००९

गुरुवार, २ एप्रिल, २००९

तू नसताना

तू नसताना मनात येते असेच काही, असेच काही 
आठवणींचे फूलपाखरू शुभ्र धुक्यातुन विहरत जाई 

तू नसताना रोजचाच हा चंद्र भासतो कसा कळाहीन 
उदास दिसती सर्व चांदण्या रिते भासते पुरे नभांगण 

तू नसताना अवतीभवती तुझेच केवळ तुझेच भास 
अणुरेणुतुन फिरतो आहे तुझाच आणि तुझाच श्वास 

तू नसताना झोपही माझी वैरीण होऊन जागतसे 
रात्र लोटते मंदगतीने दिवस उसासे टाकतसे 

तू नसताना घासही माझ्या कंठाखाली उतरेना 
तू नसताना तुझी आठवण विसरू म्हणता विसरेना 

तू नसताना तुझ्यावाचुनि कुठवर आता तगायचे 
हृदय राहिले तुझ्याकडे, मी कसे त्याविना जगायचे 

तुझ्यावाचुनि माझी हालत कळली जर का तुला प्रिये 
रुढीरितींचे बंधन तोडुन माझ्यासाठी धावत ये.

तू विसरू शकणार नाहीस

तू विसरू शकणार नाहीस 

तू विसरू शकणार नाहीस... 
नदीचा काठ चमचमतं पात्र 
उतरता घाट मोहरती गात्रं 

तू विसरू शकणार नाहीस... 
कलंडता सूर्य लवंडती सांज 
पक्ष्यांच्या माळा किणकिणती झांज 

तू विसरू शकणार नाहीस... 
सोनेरी उन्हं वार्‍याची धून 
पावलांची चाहूल ओळखीची खूण 

तू विसरू शकणार नाहीस... 
दिलेला शब्द ओझरता स्पर्श 
दडलेलं प्रेम ओसंडता हर्ष 

तू विसरू शकणार नाहीस.... 
हातात हात अन तुझं माझं हितगुज 
आंब्याच्या झाडावर पाखरांची कुजबुज 

तू विसरू शकणार नाहीस... 
भिजलेले डोळे विरलेली स्वप्नं 
थिजलेली वाट उरलेले प्रश्न 

तू विसरू शकणार नाहीस 
... अन मीही विसरू शकणार नाही.

Namaskar Maharaj

Chitrakala

Don Aatmahatra

कणा

ओलखलत का सर मला ?
पावसात आला कोणी ? कपडे होते कर्दमलेले, केसावरती पानी !
क्षणभर बसला, नंतर हसला,बोलला वरती पाहून 
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून,
माहेरवशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली ,
मोकल्या हाती जाइल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चुल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणुन पापण्या मधे पानी थोड़े ठेवले ,
कारभारनिला घेउन संगे आता लढतो आहे 
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर जरा एकटेपना वाटला
 मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा


 पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हना !  


  - कवी कुसुमाग्रज

बुधवार, १ एप्रिल, २००९

ब्लॉग अड्डा

Visit blogadda.com to discover Indian blogs

Be a Gift Giver


Be a gift-giver. To all men give charity; to yourselt respect; to a friend, your heart; to your father, deference; to your child, a good example; to a personal enemy, forgiveness; to your mother, conduct that will make her proud of you..